Mumbai Rape: मुंबईत 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी डिलिव्हरी बॉयला अटक
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी न्यायालयाकडून अनेक आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, तरीही अशाप्रकारच्या घटना घडतच आहेत. यातच मुंबईच्या (Mumbai) चारकोप (Charkop) परिसरात सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आले आहे. अपार्टमेंट सापडत नसल्याचे भासवत आरोपीने पीडित मुलीला हौसिंग सोसायटीच्या गच्चीवर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांना या घटनेची तक्रार मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झाली. त्यानंतर बुधवारी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकचंदन साहू (वय, 19) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास एका हौंसिग सोसायटीमध्ये पार्सल देण्यासाठी गेला होता. त्यावेळी पीडित मुलगी तिच्या अपार्टमेंटबाहेरील जिन्यावर खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला डिलिव्हरी ककरण्यासाठी आलेले अपार्टमेंट सापडत नाही असे भासवून तिला गच्चीवर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, घरी परतल्यावर पीडित मुलीने आपल्या सोबत घडलेला सर्वप्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडिताच्या आईने चारकोप पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे देखील वाचा- Nagpur Gangrape: मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक बलात्कार, नागपूर येथील धक्कादायक घटना

पीडित महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरीत तपास सुरु केला. त्यानंतर काहीच तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तसेच त्याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात माहिती दिली आहे.