Koyna Dam | (File Image)

मुंबईत (Mumbai) यंदा मान्सूनचे (Monsoon) आगमन यंदा फारच उशीराने झाल्यामुळे यंदा पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.  अद्याप मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला नाही. परिणामी या धरणांमध्ये कमी पाणी साचले आहे. मागच्या वर्षी धरणातील पाणीसाठा 59.33 टक्के इतका होता. यावर्षी धरणातील पाणीसाठा (Dam Water Storage) फक्त 31.29 टक्के इतकाच पाणीसाठी जमा झाला आहे. मान्सून सक्रीय होऊन महिना पूर्ण झाला तरी देखील परिस्थिती आहे.   (हेही वाचा - Mumbai: फिल्मसिटी गोरेगावमध्ये टीव्ही मालिकेच्या सेटवर बिबट्या)

आठवडाभरापासून सुरू असलेल्या हलक्या पावसाने या सातही धरणातील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणाची पाण्याची पातळी एकूण क्षमतेच्या 32.53 टक्के ऐवढी झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत धरणातील पातळी 59.33 टक्क्यांवर पोहोचली होती. मान्सूनचे उशीरा आगमन त्यात चांगला पाऊस पडत नसल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली दिसत नाहीये. मुंबई आणि उपनगरामध्ये 25 जूनपासून मान्सूनला सुरुवात झाली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला.

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा 9.07 टक्के, मोडक सागर 55.09 टक्के

तानसा 60.57 टक्के, मध्य वैतरणा 45.20 टक्के, भातसा 25.77 टक्के, विहार 48.17 टक्के, तुलसी 69.22 टक्के पाणी साठा हा उपलब्ध आहे. या महिना अखेरपर्यंत शहरात १० टक्के पाणीकपात सुरू राहणार आहे. या महिना अखेरपर्यंत पाऊस आणि धरणांमधील पाणीसाठा पाहून पाणीकपात ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय महानगर पालिकेकडून घेतला जाणार आहे.