Water | representative pic- (photo credit -pixabay)

राज्यातील धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने अनेक ठिकाणी पाणीकपात करावी लागली आहे. नवी मुंबईमध्ये तर आठवड्यातून 3 दिवस सायंकाळी पाणीकपात करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना येत्या काळात पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.  मुंबईतील धरणक्षेत्रात अपेक्षेपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे सातही धरणात एकूण 5.31 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस न पडल्याने मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागेल.  (हेही वाचा -  Mumbai Weather Forecast Today: आज मुंबई शहरात मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट)

मुंबईत गुरुवारी पहाटेपर्यंत धरणक्षेत्रात फक्त 162 मीमी पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठी कमी असल्याने महानगरपालिककेने 5 जूनपासून पाणीकपात लागू केली आहे. धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नाही आणि नागरिकांच्या पाण्याची चिंता मिटेल एवढा पाणीसाठा तयार होत नाही तोपर्यंत पाणीकपात कायम ठेवण्यात येईल. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत ऊर्ध्व वैतरणामध्ये 10 मीमी पाऊस तर मोडकसागरमध्ये 23 मीमी पाऊस, तानसामध्ये 38 मीमी, वैतरणामध्ये 18 मीमी, भातसामध्ये १० मीमी, विहारमध्ये 15 मीमी, तुळशीमध्ये 49 मीमी पावसाची नोंद झाली आहे.

जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी त्याची सुरुवात चांगली झालेली नाही. भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा स्थानकात 1 जूनपासून आतापर्यंत 210.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीपेक्षा 58 मिमी कमी आहे, तर सांताक्रूझ स्थानकात 125.4 मिमी म्हणजे 128.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 9 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्या 24 तासांत यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली.