Mumbai Police: मुंबई सायबर पोलिसांकडून Whatsapp वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा; वाचा सविस्तर
Whats App Blue Tick (Photo Credits-Twitter)

कोरोना महामारीमुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहेत. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून सोशल मिडियावरील (Social Media) अफवांचे प्रमाणही वाढले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, देशात अनलॉकला सुरुवात झाली असून अनेकजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) घरी बसून पैसे कमवण्याच्या जाहिराती येऊ लागल्या आहेत. मात्र, हा एक फसवणुकीचा प्रकार असून नागरिकांनी याला बळी पडू नये. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यांसदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या या मॅसेजमध्ये पार्ट नोकरीची संधी चालून आल्याचा दावा केला जात आहे. या कामाच्या माध्यमातून एका दिवसात 200- 300 रुपये कमवता येणार आहे. एवढेच नव्हेतर दिवसात केवळ दहा ते तीस मिनिटेच काम करावे लागणार आहे. तसेच या मॅसेज खाली दिलेल्या लिंकवर वापरकर्त्यांना नाव नोंदवण्यास सांगितले जात आहे. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला 50 रुपये मिळतील, असे सांगून खाली एक लिंक दिलेली आहे. मात्र, हा एक फसवणुकीचा प्रकार असून नागरिकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) रश्मी करंदीकर यांनी नागरिकांना केले आहे. हे देखील वाचा- Mumbai Water Cut: पाईपलाईन दुरूस्तीच्या कामामुळे 22-23 डिसेंबर दिवशी BMC कडून पाणी कपात जाहीर; इथे पहा कुर्ला, घाटकोपर भागात कोणत्या भागात होणार परिणाम

सोशल नेटवर्किंगवर मागील काही महिन्यांपासून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, अशाप्रकारच्या मॅसेजपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन मुंबई पोलीस वारंवार करत आहेत. जून महिन्यांपासून फसवणुकीच्या प्रकारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले होते.