मुंबई विमानतळांवरुन कस्टम्स विभागाने तब्बल 1.72 कोटी रुपयांचे 2.99 किलो सोने जप्त केले आहे. वेगवेगळ्या पाच प्रकरणांमधून जप्त केलेल्या सोन्याचे हे वजन आणि किंमत आहे. प्राप्त माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये हे सोने आरोपींच्या अंगावर, खाद्यपदार्थ असलेल्या खजूर आणि शरीराच्या इतर पोकळ अवयवांमध्ये साठवले होते, अशी माहिती विमानतळ आयुक्तालयाने दिली आहे. ही कारवाई 14-15 मार्च रोजी करण्यात आली.
एक्स पोस्ट
On 14-15 March, Airport Commissionerate, Mumbai Customs seized over 2.99 kg of gold valued at Rs 1.72 crores in five different cases. Gold was found concealed in dates, body cavity, on the body of Pax: Mumbai Customs pic.twitter.com/NTX0MkYyLG
— ANI (@ANI) March 15, 2024