मुंबई सीएसएमटी रेल्वे स्टेशन जवळ पादचारी पूल कोसळला;  5 ठार, 30 जण जखमी
Mumbai CSMT footover bridge collapses; several likely injured | (Photo Credits: Twitter)

मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  (CSMT)  या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणाजवळ असलेला पादचारी पूल (Footover Bridge Collapses)  गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळा. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय 35 वर्षे) आणि रंजना तांबे (वय 40 वर्षे) या दोन महिलांसह 5 जणांचा मृत्यू झाला.  तर 30 जण जखमी झाल्याची माहीती आहे. जखमींना कामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सीएसएमटी आणि कामा रुग्णालय (Cama Hospital Mumbai) या दोन्ही ठिकाणांपासून अगदी नजदीक असलेला हा पादचारी पूल असल्याने या पूलावर पादचाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते.

#UPDATE Mumbai Police on foot over bridge collapse: 23 people injured, have been shifted to hospital. pic.twitter.com/CA7TEO58WV

— ANI (@ANI) March 14, 2019

स्थानिक नगरसेवक सुजाता सानप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, हा पूल साधारण दिडशे वर्षे जुना आहे. मुंबई महापालिकेने रेल्वे प्रशासनाला हा पुल धोकादायक असून, त्याचे ऑडिट करण्यात यावे असे पत्र केव्हाच दिले आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने या पूलाचे ऑडीट करण्याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत, असा आरोपही नगरसेवकांनी या वेळी केला.

#WATCH Mumbai: A foot over bridge near Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) railway station has collapsed. Multiple injuries have been reported. pic.twitter.com/r43zS5eA0l

— ANI (@ANI) March 14, 2019

ही दुर्घटना घडली तेव्हा कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने या पूलावर पादचाऱ्यांची गर्दी होती, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या दुर्घटनेत 23 जण जखमी झाले आहेत.