मुंबईत ( Mumbai) एका सराईत गुंडाची गुप्तांग कापून हत्या करण्यात आली आहे. अनिल शेलार (वय 36 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेलार याचे आरोपीच्या मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन ही हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ (Matunga Railway Station) अनिल शेलार याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अनिल शेलार याचे सराईत गुन्हेगार असलेल्या त्याच्याच मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्याचा हा मित्र एका फसवणूक प्रकरणात अटक झाल्यामुळे तुरुंगात होता. मात्र, जानेवारीतच त्याची सुटका झाली होती. या संबंधावरुन अनिल शेलार आणि आरोपी यांच्यात वाद होता. या वादातून ही हत्या घडली. माटुंगा रेल्वे स्टेशनजवळी विद्युत विभागाच्या केबिनजवळ अनिल शेलार याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, असेही पोलिसंनी सांगितले.
अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अनिल शेलार याची हत्या झाल्यानंतर दयाराम सोळंकी उर्फ महेंद्र (वय ३५) हा फरार झाला होता. अनिल याची हत्या आणि त्यानंतर दयाराम लगेचच फरार झाल्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला होता. दरम्यान, सोळंकी यांने शेलार याला पत्नीपासून दूर राहण्यासाबाबत अनेकदा ताकीद दिली होती. अनेकदा सांगूनही न ऐलल्यामुळे सोळंकी याने अनिल याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, सोळंकी याने गोलू वाघेला उर्फ गणेश याच्यासोबत अनिल शेलार याच्यासोबत कट रचला. दोघांनी त्याला बोलवून घेतले. अनिल हा घटनास्थळी येताच त्यांच्यात बाचाबाची झाली. सोळंकी याने शेलारच्या डोक्यात सळईने प्रहार केले. घाव वर्मी लागल्याने शेलार जमिनीवरच कोसळला. तो जमिनीवर कोसळल्यानंर सोळंकी याने शेलार याचे गपु्तांग कापल्याचे पोलिसांनी या हत्या प्रकरणात माहिती देताना पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.