Mumbai Crime News: मुंबईत संपत्तीच्या वादावरून पत्नीची हत्या, भावावर जीवघेणा हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai Crime News: हैद्राबाद मध्ये पत्नीसोबत संपतीच्या वाद करून तरूणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, दरम्यान मालमत्तेच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. शुक्रवारी या प्रकरणी आरोपी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. रागाच्या भरात दोघांवर फ्लॉवर पॉट आणि बॅटने हल्ला केला आणि या जीवघेणा हल्ल्यात दोघे ही गंभीर जखमी झाले. (हेही वाचा- पत्नीशी संपत्तीवरून वाद, पतीची गळफास घेऊन आत्महत्या, हैद्राबाद येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रेसन डिसा असं या घटनेतील आरोपीचे नाव आहे. निवाशी फ्लॉट विकण्यावरून आरोपीची पत्नी चित्रा डिसा आणि भाऊ डेमियन यांच्यात वाद झाला होता. रागाच्या भरात ड्रेसनने दोघांवर फ्लॉवर पॉटने आणि बॅटने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांवर हल्ला केल्यानंतर आरोपी ड्रेसन घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमेनंतर दोघांना तात्काळ कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचार करताना चित्रा हीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या घटनेतून डेमियन याचा जीव वाचला.

या घटनेनंतर डॅमियनच्या पत्नीने आरोपी ड्रेसन विरुध्दात बांगूर नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली.पोलिस ठाण्यात ड्रेसन विरोधात खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी पाच पथक नेमले आहे. लवकरच आरोपील पकडण्यात येईल अशी माहिती बांगुर नगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.