Mumbai Crime News: पोलीसच्या वर्दीला काळीमा ! कुटूंबाला मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
Representative Image

Mumbai Crime News: पोलीसच्या वर्दीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुंबईतील एका पोलिस अधिकाऱ्यावर महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, आझाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार २०२० पाहून पोलीस निरीक्षकाने बलात्कार करत असल्याचे तीनं म्हटलं आहे.  ऑक्टोबर २०२० साली आरोपीने पीडित महिलेवर शिवाजी पार्क परिसरात बलात्कार केला. पीडित महिलेला धमकी आणि अत्याचाराचा सामाना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य दहसतवादविरोधी विभागातील एपीआय विश्वास पाटील असं बलात्कार करणाऱ्या आरोपी पोलिसांचे नाव आहे. २०१९ पासून एका केस संदर्भात दोघांची ओळख झाली. महिलेशी ओळख वाढवून तीच्यावर अत्याचार करण्यात आला. एका तपासादरम्यान महिलेशी ओळख वाढवून विश्वास यांनी तीला कॉल्डड्रिंग दिल ज्यात त्याने गुंगीचे औषध टाकले होते.महिला बेशुध्द झाल्यावर तीच्यावर बलात्कार करण्यात आला. याचे रेकॉर्डिंग करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकी देत महिलेवर अनेकदा अत्याचार केले. कुटूंबाला मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

महिलेवर या गोष्टीचा तणाव वाढच चालला होता. पाटीलच्या अत्याचार सहन होत नसल्याने महिलेने पोलिसांत धाव घेतली. आझाद मैदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास करत आहे. या प्रकारणात मुंबई पोलिसांचा आणखी तपास सुरु झाला आहे.