दिंडोशी (Dindoshi) येथील सत्र न्यायालयाने (Session Court) एका 32 वर्षीय व्यक्तीला पोक्सो अॅक्ट ( POCSO Act) अंतर्गत तरतुदीनुसार दोषी ठरवले असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकरणामध्ये आरोपी एका मुलीचा पाठलाग करून तिला वारंवार 'आजा आजा' म्हणायचा. दरम्यान मुलीला मनाविरूद्ध त्याच्यासोबत येण्यासाठी हट्ट करण्याची ही कृती लैंगिक छळ (Sexual Harassment) असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.
Free Press Journal च्या माहितीनुसार, हा प्रकार 2015 सालचा आहे. सप्टेंबर महिन्यातील या घटनेमध्ये 15 वर्षीय पीडीता दहावीची विद्यार्थिनी असताना हा प्रकार घडला होता. चालत जेव्हा ही विद्यार्थिनी फ्रेंचच्या क्लासला जात होती तेव्हा हा आरोपी विशीमध्ये होता. सायकलवरून तिचा पाठलाग करत असताना तो तिला 'आजा आजा' म्हणत असे. हा प्रकार काही दिवस चालत होता.
पहिल्या दिवशी तिने रस्त्यावर असलेल्या पुरुषांची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता, ज्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या सायकलवरून पळून गेला. तिने तिच्या ट्यूशन शिक्षिका आणि आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला होता. आईने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. नंतर आरोपी शेजारील इमारतीत रात्री पहारेकरी म्हणून काम करत होता. नक्की वाचा: Viral Video: कर्नाटकात मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थिनींनी धु धु धुतलं; पहा व्हायरल व्हिडिओ .
आरोपीने त्याच्या जबाबामध्ये, त्या व्यक्तीने त्याला पत्नी आणि तीन वर्षांचे मूल असून आपण गरीब असल्याचे कारण सांगून न्यायालयाकडे सवलत मागितली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश AZ Khan यांनी त्याला सप्टेंबर 2015, त्याला अटक करण्यात आली तेव्हा आणि मार्च, 2016 या कालावधीत त्याला जामीन मिळाल्याच्या कालावधीची शिक्षा सुनावली आहे.