मुंबईत आज कोरोनाचे आणखी 1185 रुग्ण आढळून आल्याने आकडा 21152 वर पोहचला, महापालिकेची माहिती
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असल्याचे दिसुन आले आहे. तर नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला असून आपल्याला कोरोनाची साखळी कोणत्याही परिस्थितीत तोडायची असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता घरात राहण्यासोबत बाहेर पडण्यापूर्वी सावध व्हा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याच दरम्यान आता मुंबईत आज कोरोनाचे नवे 1185 रुग्ण आढळून आल्याने एकूण कोविड19 च्या रुग्णांची संख्या 21152 वर पोहचल्याची माहिती मुंबई महालिकेकडून देण्यात आली आहे.(Coronavirus: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी साधला संवाद)

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे रेड झोनमध्ये असून तेथे नियम शिथील करण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच येत्या काही काळात ग्रीन झोनमधील नियम शिथील करण्याबाबत स्पष्ट केले जाईल असे सांगण्यात आले आहे. कोरोनावर अद्याप कोणती ही लस उपलब्ध नसून त्याबाबत संशोधन केले जात आहेत. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 21 हजारांच्या पार गेला असून आज 23 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा एकूण आकडा 757 वर पोहचला आहे.(BMC: मुंबई येथील धारावी परिसरात एकूण 1 हजार 327 कोरोनाबाधित; दिवसभरात 85 नव्या रुग्णांची नोंद)

दरम्यान, राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आता लॉकडाउनच्या नियमांचे पालन करत कोरोनासंदर्भात लागू करण्यात आलेले निर्बंध लवकरात लवकर कधी संपतील याचा विचार करावा. तसेच पावसाळा सुरु होण्यापूर्वी कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचसोबत कोरोनानंतर आता जग नक्कीच बदलेल अशा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.