मुंबईकरांना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. जानेवारी महिन्यात कोस्टल रोडचा (Mumbai Costal Road) पहिला टप्पा सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दिली. ते सीएसआर एक्सलन्स अवॉर्डस् प्रदान सोहळ्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पुढच्या महिन्यात मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यान कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे, सगळ्यात जास्त इन्फ्रा प्रोजेक्ट आजच्या काळात महाराष्ट्रात आहेत. पूर्वीच्या काळात सगळं बंद करण्यात आलं होतं, आमचं सरकार आल्यावर सगळे प्रकल्प सुरू झाले. (हेही वाचा - मुंबईत जुहू बीच सफाई मोहिमेदरम्यान CM Eknath Shinde यांनी घेतला ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद (Watch Video))

शिवडी ते नाव्हा हा 22 किमीचा MTHL हा रस्ताही पुढील महिन्यात सुरु होईल. दोन तासांचा रस्ता फक्त 15 मिनिटांत पार होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे, असेही शिंदे म्हणाले. दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा CSR जर्नल एक्सलेन्स पुरस्कार वितरण सोहळा 2023 मुंबई स्टॉक एक्सचेंज येथे आज पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार यांना राजनाथ सिंह आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे यांना सी एस आर जर्नल पुरस्कार देण्यात आला. श्रीकांत शिंदे उपस्थित नसल्याने एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.