करी रोड जवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. करी रोड वरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने जलद मार्गावरील वाहतुकीला याचा फटका बसला आहे. यामुळे रेल्वे स्थानकात नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. त्याचसोबत रेल्वे स्थानकातील वाहतूक पुन्हा कधी पूर्ववत होईल याची घोषणा अद्याप केलेली नाही.

तसेच मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर मंकी हिल ते कर्जतदरम्यान महिनाभर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक कामांमुळे 30 नोव्हेंबरपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पंढरपूर-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-विजापूर-मुंबई, पनवेल-नांदेड-पनवेल साप्ताहिक, पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.(विना तिकीट प्रवास करणाऱ्यांमुळे Central Railway च्या उत्पन्नात 'अशी' झाली वाढ)

यापूर्वी कल्याण येथून ठाण्याकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच पार्सिक बोगद्याजवळ रेल्वेरुळाला तडे गेल्याने वाहतूक थांबवण्यात आली होती. यामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशा प्रकारांमुळे नेहमीच त्रास सहन करावा लागतो. त्याचसोबत प्रत्येक रविवारी मध्य रेल्वेवर विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. मात्र सुनिश्चित वेळेत काम पुर्ण न झाल्याने काहीवेळेस रात्रकालीन मेगाब्लॉक सुद्धा ठेवण्यात येतो. या दरम्यान प्रवाशांसाठी रेल्वेचे वेळापत्रक बदलून नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. परंतु तरीही मध्य रेल्वेवर कधीच ट्रेन वेळेवर न आल्याचे प्रकार घडत असल्याने त्याबाबत रोष प्रवाशांकडून व्यक्त केला जातो.