मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांना आजपासून (11 फेब्रुवारी) वायफाय, मोबाईल अॅप द्वारा रेल्वे प्रवासादरम्यान सिनेमा, टेलिव्हिजन शो आणि गाणी त्यांच्या मोबाईल वर मोफत पाहता येणार आहे. या नव्या सेवेमध्ये प्रवाशांना प्री लोडेड आणि बहुभाषिक कंटेट पाहता येणार आहे. त्यामध्ये सिनेमे, न्यूज आणि म्युझिक व्हिडिओ यांचा समावेश असणार आहे.
सुरूवातीला मेन लाईन वरील 10 लोकल मध्ये ही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. उर्वरित 155 लोकल मध्ये टप्प्या टप्प्याने ती उपलब्ध करून दिली जाईल. ट्रेन मध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर द्वारा वायफाय नेटवर्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा मेन लाईन वर सीएसटीएम-कल्याण/ कर्जत/ कसारा मार्गावरील लोकलवर ही सोय मिळेल.
प्रवाशांना ही सोय मिळावी म्हणून ‘SugarBox’ app डाऊनलोड करावी लागणार आहे. कंटेड पाहण्यासाठी इंटरनेटची गरज लागणार नाही. तसेच प्रवाशांना यासाठी कोणतेही अधिकचे शुल्क मोजावे लागणार नाही. नक्की वाचा: UTS App-Universal Pass Linking: मुंबई लोकल प्रवासासाठी आजपासून युटीएस अॅप वर तिकीट बुकींग सुरू; पहा Universal Pass कसा करायचा लिंक?
कशी मिळवाल ही सोय?
- प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर मध्ये SugarBox app सर्च करा.
- ट्रेन मध्ये क्यूआर कोड उपलब्ध असेल तो स्कॅन करा किंवा अॅप डाऊनलोड करून इंस्टॉल करा.
- डिव्हाईस लोकेशन स्विच ऑन करा.
- तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करा. त्यासाठी ओटीपी दिला जाईल. आता SugarBox WiFi ला तुम्ही कनेक्ट करू शकाल.
- तुमचा मोबाईल डाटा नेटवर्क डिसकनेक्ट करा.
- आता मोबाईलवर मोफत सिनेमे, शो आणि SugarBox app वर शॉपिंग करू शकाल. यासोबत शुगरबॉक्सला सपोर्ट केलेल्या पार्टनर अॅप वरील सेवा देखील घेऊ शकाल.
रेल्वेला या कंटेड ऑन डिमांड द्वारा 1 कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळणार असल्याची आशा आहे. सध्या लोकल मध्ये कंटेट ऑन डिमांड अंतर्गत रेल्वेच्या डब्ब्यात मीडीया सर्व्हर यंत्रणा बसवली जात आहे. टप्प्याटप्प्याने ती सार्या लोकलमध्ये उपलब्ध होणार आहे.