मुंबई: केरळ मधील सीपीएम नेते कोडियेरी बालकृष्णन यांचा मुलगा बिनॉय कोडियेरी याच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate)

केरळमधील (Kerala) सीपीएम नेते (CPM Leader) कोडियेरी बालकृष्णन (Kodiyeri Balakrishnan) यांचा मुलगा बिनॉय कोडियेरी (Binoy Kodiyeri) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा ओशिवरा पोलिस ठाण्यात (Oshiwara Police Station) नोंदवण्यात आला आहे. पीडित महिलेने बिनॉय विरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केल आहे. दुबईतील एका डान्स बारमध्ये बनॉय आणि पीडित महिलेची ओळख झाली होती.

बिनॉय आणि पीडित महिलेची ओळख डान्सबार मध्ये झाली होती. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. 2010 मध्ये बिनॉय तिला घेऊन मुंबईत आला. तिच्यासाठी मुंबईत भाड्याचे घर घेतले. लग्नाचं आमिष दाखवत त्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्या दोघांना 8 वर्षाचं मुलं देखील आहे. मात्र आता बिनॉय तिला टाळत असल्याने पीडित महिलेने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांनी दिली आहे.

ANI ट्विट:

याप्रकरणी भारतीय दंड विभाग कलम 376 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.