प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या बाहेर होणारी गर्दी पाहता महापालिकेकडून दोन नवे पाचदारी पूल उभारण्यात येणार आहेत. हे पूल हाजी अली ते वरळी नाका यांना थेट जोडणारे असल्याने तेथे गर्दीचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या मार्गावरुन जवळजवळ 5 हजार गाड्यांची वाहतूक प्रत्येक तासाला होत असते. तर या पुलाची नुतनीकरण करण्यासाठी 6 करोड रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

महापालिकेकडून उभारण्यात येणारा एक पादचारी पूल रेल्वेच्या दक्षिण बाजूला असणार असून तो वांद्रे-वरळी सी लिंक सारखा असणार आहे. हा पूल केशवराव खाडे मार्ग, रेसकोर्स रोड येथून हाजी अली येथे जोडण्यात येण्यात येणार आहे. तर दुसरा पादचारी पूल सात रस्त्याच्या नैऋृत्य बाजूस उभारण्यात येणार आहे. हा मार्ग धोबी घाट येथून रेल्वे मार्गावरुन थेट वरळी नाका येथे जोडला जाणार आहे. तर प्रत्येक तासाला या मार्गावरुन 2500 वाहतूक चालवण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. या पुल बांधणीसाठी 507 करोड रुपयांचा एकूण खर्च येणार आहे. महापालिकेकडून याचे कॉन्ट्रॅक्ट मुंबईतीलच एका स्पेक्ट्रम कन्सल्ट्स यांना देण्यात आले आहे. दोन महिन्यात या पुलांच्या बांधणीचे काम सुरु होणार असून 2022 पर्यंत पूर्ण होतील असे सांगण्यात आले आहे.(सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरण: अटक झालेल्या ऑडिटर नीरज देसाई यांच्यासह 3 बीएमसी अभियंत्यांना 9 महिन्यांनंतर जामीन)

 तर महालक्ष्मी रेल्वेस्थानकाच्या बाहेरील गाड्यांना सातरस्ता येथून वरळी नाका आणि हाजी अलीच्या दिशेने जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र आता या दोन नव्या पादचारी पुलांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल अशी शक्यता महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोस्टल रोड मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या पादचारी पूल पूर्ण होतील. तोपर्यंत महालक्ष्मी पूल तोडण्यात येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.