मुंबईत आजपासून (1 फेब्रुवारी) पुन्हा एकदा प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. तसेच फेरीवाल्यांकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. त्याचसोबत फेरीवाला परवाना तात्काळ रद्द करुन दंड महालिकेकडून ठोठावण्यात येणार आहे. या प्लास्टिक बंदी विरोधात महापालिकेने पुन्हा एकदा पावले उचलत एका विशेष टीमची नियुक्ती करुन त्यांच्यामाध्यमातून फेरीवाल्यांची झडती घेतली जाणार आहे.
राज्यात प्लास्टिक बंदी केल्यानंतर थर्माकोलच्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली होती. पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी 23 जून 2018 मध्ये ही प्लास्टिक बंदी राज्यात लागू केली होती. त्यानंतर प्लास्टिक बंदीबाबत जोरदार विरोध केला जाऊ लागला होता. मात्र काही दिवसातच प्लास्टिक बंदीपूर्वीची स्थिती पाहायला मिळाली. फेरीवाले ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशव्या पुन्हा देऊ लागल्याचे चित्र दिसून आले. मात्र आजपासून मुंबईत फेरीवाल्यांकडे प्लास्टिक पिशवी आढळल्या कडक कारवाई होणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. (हेही वाचा-उद्यापासून प्लास्टिक पिशवी वापरल्यास कडक कारवाई होणार)
तसेच प्लास्टिक बंदी ही फक्त रस्त्यांवरील फेरीवाल्यांपूर्तीच मर्यादित नसून रेल्वे, विमानतळ आणि मेट्रोच्या ठिकाणी सुद्धा प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली होती. तर आजवर महापालिकेने 2.5 करोड रुपयांचा दंड जमा केला असून 48, 163 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.