शुक्रवार (1 फेब्रुवारी) पासून पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीवर आवाज उठवला जाणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने उद्यापासून प्लास्टिक पिशवी फेरीवाल्यांकडे आढळल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच पालिकेने या कारवाईसाठी एक विशेष टीमची योजना केली असून फेरीवाल्यांची ही टीम झटती घेणार आहे. त्याचसोबत ज्या फेरीवाल्याकडे प्लास्टिक पिशवी आढळणार त्याचा परवाना तात्काळ रद्द केला जाणार आहे.
राज्यात सरकारने 23 जून 2018 पासून प्लास्टिक बंदी सुरु केली होती. मात्र काही वेळापूर्तीच प्लास्टिक बंदी झाली असल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु केला. त्यानुसार आता महापालिका कडक कारवाई करणार असून एक ब्लॅक लिस्ट तयार करणार आहे. त्यामुळे ज्या फेरीवाल्यांचे नाव या लिस्ट मध्ये असणार त्यांचा फेरीवाला परवाना प्रक्रियेतून काढून टाकण्यात येणार आहे.
पालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी 107 इन्स्पेक्टर, 400 सीनियर इन्स्पेक्टर आणि 260 कामगारांटची टीम तयार करण्यातआली आहे. या टीमसाठी निळा कोट आणि काळी टोपी असा पोशाख नेमून देण्यात आला आहे.