विना मास्क (Mask) फिरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Coroporation) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. मुंबई येथील सांताक्रूझ परिसरात असलेल्या बॉम्बे अड्डा या नाईट क्लबमध्ये (Nightclab) मोठ्या प्रमाणावर करोना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या क्लबमध्ये रात्री उशीरा छापा टाकला. त्यावेळी क्लबमध्ये विना मास्क हुल्लडबाजी करणारे 275 जण आढळून आले. त्यामुळे या प्रकरणी बॉम्बे अड्डा या नाईट क्लबला 30 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोरोना संकटाने संपूर्ण जगाला हादरुन सोडले आहे. कोरोनावर शंभर टक्के गुणकारी ठरेल, अशी लस अद्याप निर्माण झाली नाही. यामुळे नागरिकांना सोशल डिस्टेन्सिंग आणि मास्क घालणे बंधनकारण करण्यात आले आहे. एवढेच नव्हेतर, कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांकडून मुंबई महानगरपालिका दंड वसूल करत आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री बॉम्बे अड्डा या क्लबवर छापा टाकला. दरम्यान, बॉम्बे अड्डा येथे विना मास्क आढळून आलेल्या 275 जणांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे. हे देखील वाचा- Maratha Reservation: मराठा आंदोलकांचा मुंबईत आंदोलनाचा इशारा; पोलिसांकडून अनेक ठिकाणी नाकाबंदी; काही जण ताब्यात
मुंबई शहरात मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर योग्य प्रकारे कारवाई केली जात आहे. परंतु, तरीही लोक हलगर्जीपणा दाखवत आहेत. त्यांनी आता सुधारले पाहिजे. मुंबई महानगरपालिका मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून वसूल केलेल्या रकमेतून नागरिकांना मास्कचे वाटप करणार आहे, असे इक्बाल सिह चहल यांनी सांगितले आहे.