Mumbai: राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप, भाजप नेत्याची ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल
ममता बॅनर्जी (फोटो सौजन्य- ANI)

मुंबईतील एका भाजप नेत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या विरोधात राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप लावत तक्रार दाखल केली आहे. भाजप नेत्याने आपल्या तक्रारीत असे म्हटले की, ममता यांनी कथित रुपात बसूनच राष्ट्रगीत म्हटल्याने हा प्रकार चुकीचा आणि अनादर केल्यासारखा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, केंद्राला घेरण्यासाठी ममता बॅनर्जी सध्या सध्या देभरातील विविध ठिकाणी दौरे करत आहेत. याचवेळी त्यांनी मुंबईत काही बड्या राजकीय नेत्यांची भेट घेतली.

भाजप नेत्याने असे ही म्हटले की, बसून जन-गण-मन म्हटले आणि नंतर अचानक 4-5 वाक्यांनतर त्या थांबल्या. त्यांनी राष्ट्रगीताच्या प्रति पूर्णपणे अनादर केला आहे. यामुळेच पोलिसात तक्रार दाखल केली आहे.(ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर काॅग्रेस प्रवक्ते यांचा सवाल, भाजपचा मुकाबला करणाऱ्या राज्यात एका पक्षाचा पाया कसा असू शकतो)

Tweet:

तर बंगालमधील भाजपने ममता बॅनर्जी यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातूनच बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ममता बॅनर्जी आधी बसून राहिल्या आणि नंतर उभ्या राहिल्यानंतर अचानक राष्ट्रगीत गाणे त्यांनी थांबवले. एका मुख्यमंत्र्यांच्या आधारावर त्यांनी बंगालची संस्कृती, राष्ट्रगीत आणि देशासह रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला आहे.

Tweet:

दरम्यान, बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. येथे त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी असे म्हटले की, एखादा व्यक्ती काहीच करत नाही आणि फक्त परदेशातच राहतो तर काम कसे चालेल? त्याचसोबत तुम्ही फिल्डमध्ये राहिला नाहीत तर भाजप तुम्हाला बोल्ड करेल. परंतु या उलट तुम्ही केले तर भाजपचा पराभव होईल.