मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता शिकवण्याची मागणी केली आहे. तर योगिता कोळी यांनी असे म्हटले की, पुढील पिढीसाठी नैतिक मुल्यांचा योग्य विकास होण्यासठी सार्वजनिक शाळांमध्ये हिंदू धर्मग्रंथ श्रीमभगवद्गीता शिकवली पाहिजे. याच संदर्भात त्यांनी महापौरांना सुद्धा पत्र लिहिले होते. कोळी या महापालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीसह नागरी आरोग्य समितीच्या सदस्या सुद्धा आहेत. मात्र कोळी यांनी महापौरांना पत्र लिहिल्यानंतर याचा विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांनी याचा विरोध केला आहे.
योगिता कोळी यांनी त्यांच्या पत्रात अशी मागणी केली होती की, महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीतेचे पठन व्हावे. परंतु त्यावर रईस शेख यांनी महापौरांना पत्र लिहून भाजपची नोटीस फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. महापौरांना लिहिलेल्या पत्रात शेख यांनी असे म्हटले की, भाजपची ही मागणी फेटाळली पाहिजे. कारण फक्त मत मिळण्याच्या उद्देशाने हे केले जात असल्याचा आरोप रईस शेख यांनी केला आहे. त्याचसोबत गटनेत्यांच्या बैठकीत असे ठरवण्यात आले होते की, धार्मिक शिक्षणाचा कोणताही प्रस्ताव महापालिकेच्या बैठकीत आणू नये.(Deepak Kesarkar On Narayan Rane: दीपक केसरकर यांची नारायण राणेंनवर टीका, बोलयच आहे तर संसदेत बोला, कामाचा चांगला 'परफॉर्मन्स' दाखवा)
भाजप नगरसेवक योगिता कोळी यांनी पत्रात भगवद्गीतेचे महत्व सांगितले आहे. परंतु आता यावरुन नवा वाद सुरु झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका योगिता कोळी यांच्या या मागणीला काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.