Mumbai: आता मेट्रो-1 मधून उतरल्यावर सायकलने पोहोचा इच्छित स्थळी; लवकरच प्रशासनाकडून 2 रुपये प्रति तासात Cycle उपलब्ध
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

मेट्रोमधून (Metro Station) उतरल्यावर बस किंवा ऑटोने प्रवास करणारे प्रवासी, लवकरच सायकलवरून इच्छित स्थळी पोहचताना दिसणार आहेत. प्रवाशांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेट्रो -1 ने भाड्याने सायकल (Cycle) देण्याचा निर्णय घेतला आहे. 24 फेब्रुवारीपासून प्रवाशांना प्रति तास 2 रुपयांनी सायकल मिळणार आहे. मेट्रो -1 प्रशासनाने मेट्रो प्रवाशांना स्वस्त दरात दुचाकी उपलब्ध करुन देण्यासाठी मायबायक अॅपशी करार केला आहे.

याद्वारे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी प्रवासी सायकल बुक करू शकतात. मेट्रो -1 च्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा केवळ जागृती नगर (Jagruti Nagar) स्टेशनवर उपलब्ध असेल. प्रवाशांच्या प्रतिसादाच्या आधारे भविष्यात सर्व स्थानके त्यास जोडली जातील.

तासाला 2 रुपयांच्या सायकलसह प्रवास करण्यासाठी, प्रथम प्रवाशांना मायबाइक अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर तुमचे प्रोफाइल तयार करून 500 रुपयांच्या ठेवीची रक्कम जमा करावी लागेल. अ‍ॅपद्वारे लोक सायकली भाड्याने घेऊ शकतात. भविष्यात मेट्रो स्थानक तसेच जवळील व्यावसायिक परिसर आणि शैक्षणिक संस्था येथेदेखील सायकल स्टँड बांधले जातील. घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान दररोज मेट्रो -1 मधून सुमारे 2 लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रोमधून उतरल्यावर या प्रवाशांना रिक्षा किंवा बास घेऊन पुढे जावे लागते. अशा प्रवाशांसाठी वाहतुकीचे आजू एक साधन उपलब्ध होणार आहे. (हेही वाचा: 'या' कंपनीने बाजारात आणली तब्बल 31 हजाराची इलेक्क्ट्रिक सायकल; जाणून घ्या वैशिष्ट्ये)

मेट्रोच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, लोक दीर्घ कालावधीसाठी त्यांच्याबरोबर सायकल ठेवू शकतात. प्रवासी सकाळी ऑफिसला जाताना सायकल भाड्याने घेऊन, कार्यालयात पार्क करून संध्याकाळी स्टेशनच्या स्टँडवर सायकल ठेवू शकतात. त्याचप्रमाणे चित्रपटगृहात जाणारे किंवा स्टेशनजवळ शॉपिंग करणारेही प्रवासीही या सेवेचा लाभ घेऊ शकतात. या मोहिमेसह अधिकाधिक लोकांना जोडण्यासाठी त्याचे भाडे ताशी 2 रुपये निश्चित केले गेले आहे.

बहुतेक लोकांच्या कार्यालयात 8 ते 10 तासांचा वेळ असतो. 9 तास सायकल तुमच्याजवळ ठेवल्यानंतरही केवळ 18 रुपये द्यावे लागतात, दुसरीकडे दीड किलोमीटरच्या प्रारंभीच्या प्रवासासाठी ऑटोला 18 रुपये द्यावे लागते. अशा प्रकारे सायकल सुविधा खिशाला परवडणारीही आहे.