मुंबईतील आर्थर रोड जेलमधील 72 कैदी आणि 7 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह
Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा आता 10 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सद्यची कोरोनाची परिस्थिती गांभीर्याने घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी अहोरात्र उपचार करत आहेत. याच दरम्यान आता मुंबईतील आर्थर रोड जेल मधील 72 कैदी आणि 7 अधिकाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना उद्या सुरक्षीत वाहनांच्या सहाय्याने जीटी हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना ही स्वतंत्रपणे उपचारासाठी हलवण्यात येणार आहे.

राज्यावर आलेले कोरोनाचे महासंकट पाहता राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 18,120 वर पोहचला आहे. तर आज 1362 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच राज्य सरकारकडून आता राज्यात लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला आपल्या जिल्ह्यात परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.(मुंबई पोलिस खात्यामध्ये 250 जणांना कोरोनाची लागण, कुणीही ICU मध्ये नाही: पोलिस कमिशनर परम बिर सिंग यांची माहिती)

दरम्यान, राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र  सरकारने लॉकडाउनचे नियम काही ठिकाणी शिथिल केल्यानंतर नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. तर  पोलीस दलातील 487 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.