Mumbai Airport Customs | (Photo Credit - ANI)

छत्रपती शिवाजी महाहाज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) येथे सीमाशुल्क विभागाने (Mumbai Airport Customs) एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. तब्बल 4.9 कोटी रुपयांचे कोकेन चप्पलच्या पोकळीत लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ही घटना गुरुवारी (29 सप्टेंबर) उघडकीसआली. सीमाशुल्कच्या (Mumbai Customs) अधिकाऱ्यांनी तिच्याकडून 490 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आल्याचे सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, कस्टम अधिकाऱ्यांनी या महिलेला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संशय आल्याने अडवले. या वेळी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिची अधिक चौकशी करता प्रश्नांची उत्तरे देताना तिची भंबेरी उडाली. त्यामुळे अधिकाऱ्यांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी तिची झडती घेतली.

सदर महिलेची झडती घेतली असता तिच्या चप्पलमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. अधिकाऱ्यांनी तिची चप्पल तपासली असता त्यात कोकेनच्या पुड्या मोठ्या कल्पकतेने लपवून ठेवलेल्या आढळून आल्या.

ट्विट

अडवले. झडतीदरम्यान, अधिकार्‍यांना तिच्या चप्पलमध्ये बनवलेल्या एका विशेष पोकळीत कल्पकतेने लपवून ठेवलेले कोकेन सापडले, असे मुंबई सीमाशुल्क विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे. सदर महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयासमोर हजर केली असता न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली.