मध्य रेल्वे एसी लोकल । Photo Credits: Twitter / @rajtoday

मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरील बहुप्रतिक्षित एसी लोकल (AC Local)  काल (30 जानेवारी) दिवशी दिमाख्यात सुरू करण्यात आली. मात्र पहिल्याच दिवशी ट्रान्सहार्बरवर एसी लोकल (Air Conditioned EMU Local Train) सुमारे 25 मिनिटं उशिरा आल्याने प्रवाशांची झुंबड पहायला मिळाली आहे. नेरूळ स्टेशनवर आज सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी एसी लोकल येणं अपेक्षित होतं मात्र ही लोकल 25 मिनिटं उशिरा आल्याने नेरूळ स्थानकावर मोठी गर्दी पहायला मिळाली. यामुळे काही काळ चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. मध्य रेल्वे मार्गावर 30 जानेवारीला होणार पहिल्या एसी लोकलचा शुभारंभ, महिला मोटर वूमन स्विकारणार सारथ्य.  

नेरुळ स्थानकामध्ये 9.19 ला येणारी लोकल आता 9.45 ला आली त्यावेळेस स्थानकामध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला. सकाळच्या वेळेस कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. यामध्ये रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं तर स्टेशन आणि स्थानकामध्ये मोठी गर्दी उसळते. तशीच स्थिती आज नेरूळ स्थानकामध्ये पहायला मिळाली. पहिल्यास दिवशी एसीला नेमका कशामुळे उशिर झाला हे कारण सांगण्यात आलेले नाही.

नेरूळ स्थानकातील गर्दीचं दृश्य

एसी लोकलचे तिकीट ठाणे-वाशी मार्गासाठी सुमारे 130 रुपये आणि ठाणे-पनवेल मार्गासाठी सुमारे 175 रुपये असेल. एसी लोकलचे दरवाजे ऑटोमेटिकली लॉक-अनलॉक होणार आहेत. ही लोकल पनवेल ते ठाणे आणि पनवेल ते वाशी दरम्यान धावणार असून एकूण 16 फेऱ्या दिवसभरात होणार आहेत. तर सामान्य लोकलच्या 15 फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रान्स हार्बरच्या मार्गावर नव्याने सुरू झालेली ही एसी लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे.