मुंबई मध्ये अभिनेत्रीचा इंटिरिअर डिझायनर वर Molestation चा आरोप; Oshiwara Police Station मध्ये तक्रार दाखल
Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate)

मुंबई (Mumbai)  मध्ये एका अभिनेत्रीने एका इंटिरियर डिझायनरवर छेडछाडीचे (Molestation) आरोप लावले आहेत. याबाबत ओशिवरा पोलिस स्टेशन (Oshiwara Police Station) मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिस तपास सुरू झाला आहे. छेडछाड च्या आरोपी इंटिरियर डिझायनरचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. हे प्रकरण जुलै महिन्यातील आहे. तसेच मीडीया रिपोर्ट्सनुसार आरोप करणारी अभिनेत्री बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमामध्ये काम करणारी आहे.

पोलिसांनी मीडीयाला दिलेल्या माहितीनुसार, वीरा देसाई अंधेरी मध्ये 35 वर्षीय अभिनेत्रीने नुकताच एक फ्लॅट खरेदी केला आहे. यानंतर फ्लॅटचं इंटिरियर करण्यासाठी एका डिझायनरला नेमलं. अभिनेत्रीने तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीमध्ये जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात जेव्हा घर बघायला गेली तेव्हा तिने कामावर नाखुशी व्यक्त केली. तिने डिझायनर सोबत चर्चा केली आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्याचं सांगितलं. यानंतर अभिनेत्रीसोबत अपशब्द वापरून तिच्या संभाषण करून तिला स्वतःच्या घरामधून हाकलण्यात आलं. याप्रकरणानंतर आरोपीने पोलिस स्टेशन मध्ये जाण्याची देखील धमकी दिली होती. (नक्की वाचा: Gehana Vasisth ने मुंबई पोलिसांवर लावले गंभीर आरोप, अटक न करण्यासाठी 15 लाख मागितल्याचा दावा).

ANI Tweet

ओशिवारा पोलीस स्टेशन मध्ये तक्रारीनंतर आईपीसी कलम 354, 504, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआयच्या माहितीनुसार, अद्याप या प्रकरणामध्ये कोणतीही अटक झालेली नाही. पोलिसांचा तपास मात्र सुरू आहे.