मराठा समाजाचे प्रश्न शासन निर्णयाव्दारे बाजूला पडलेले दिसत आहेत. त्यासाठी 3 हजार विद्यार्थी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. तसेच मराठा समाजाचे आमदार, खासदार सत्तेत आहेत. तरीदेखील मराठा समाजाला न्याय मिळत नाही, अशी टिप्पणी अंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. मराठा समाजाचे तरुण गेल्या 6 दिवसांपासून आजाद मैदानात अंदोलन करत आहेत. महत्वाचे म्हणजे, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करू, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चातील (Maratha Kranti Morcha) तरूणांनी सरकारला दिला आहे.
मुंबई येथील आझाद मैदानात मराठा तरूणांनी अंदोलन पुकारले आहे. या अंदोलनाचा आज सातवा दिवस असून कोणत्याही नेत्यांनी आझाद मैदानात भेट दिली नाही, असा आरोप क्रांती मोर्चातील नेत्यांनी केले आहेत. मराठा समाज आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षांपासून झुंज देत आहेत. तसेच सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात आली असून कोणतीही मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही, असे अंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. हे देखील वाचा-जालना: शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दीसाठी हिरोईन आणू, भाजप नेते बबनराव लोणीकर यांची जाहीर कार्यक्रमात घसरली जीभ
मराठा समाजाच्या मागण्या-
-मौजे कोपर्डी कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
-मराठा समाजास कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण मिळालेच पाहिजे.
-अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ठी करावी.
-शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती व शेतीमालास हमीभाव मिळणे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे.
-प्रकल्पासाठी शेतजमीन संपादन करताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे बंद करणे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत देणे.
-कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा यांना जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे.
-मराठा,इतर मागास, खुला प्रवर्गातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांचेवर पदोन्नतीत होणारा अन्याय थांबविण्यात यावा.
-अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.
-मराठा समूहाच्या सर्वागीण विकासासाठी शासनाने शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (SARTHI) स्वायत संस्था त्वरित सुरु करण्यात यावी.
-छत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणी त्वरित सुरु करणे. छत्रपती शिवरायांच्या गडकोट विकासाचे काम त्वरित हाती घ्यावे. राजर्षी शाहू महाराजांच्या शाहू मिल कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम चालू करण्यात यावे.
-प्रत्येक जिल्हात मराठा भवनसाठी शासकीय जमीन देण्यात यावी.
-प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या 500 विद्यार्थ्यांचे वसतिगृह निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु करावी. त्याचप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी,प्रकल्पग्रस्त,धरणग्रस्त यांच्या वारस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारे वसतिगृह बांधण्यासाठी जिल्हापरिषद व स्थानिक महापालिकांना निर्देश देण्यात यावेत.
- 6 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा कुटुंबातील विद्यार्थ्यांना सवलती मिळणेबाबत. माठा क्रांती मोर्चाच्या मागणीनुसार ईबीसी योजनेची आर्थिक मर्यादा 1 लाख वरून 6 लाख केली आहे. या योजनेचा विस्तार वाढवण्यासाठी त्यातील काही
-अटीमध्ये दुरुस्त्या करणे, योजनेचा विस्तार करणे. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळविणे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या समस्या, अधिवास प्रमाणपत्र यासारखे प्रश्न सोडविणे. मात्र एवढ्याने मराठा समाजाचे प्रश्न सुटू शकत नाही. एस.सी एस.टी
-इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांसाठी सवलती मिळाव्यात.
मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या अंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच मराठा समाजाच्या मागण्या कधी पूर्ण होणार, असाही प्रश्नही सर्वांना पडला आहे.