मुंबईतील पायलट अमोल यादव (Amol Yadav) यांनी एक एअरक्राफ्ट (Aircraft) बनवले आहे. हे एअरक्राफ्ट 6 सीटर असून त्याच्या उड्डाणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याी त्यांनी माहिती दिली आहे. अमोल यांनी पुढे असे म्हटले आहे की, हे एअरक्राफ्ट त्यांनी स्वत:च्या घराच्या गच्चीवर निर्माण केले आहे. तसेच विमानाच्या विविध युक्ती क्षमेतीची चाचणी सुद्धा यशस्वी ठरली आहे. मात्र आता या एअरक्राफ्टसाठी उड्डाण परवाना मिळणे आवश्यक असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. यादव यांनी ANI शी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली आहे.(Independence Day 2020: स्वातंत्र्य दिनी भारतीय सैन्याच्या जवानांचे जम्मू-काश्मीर मधील गुरेझ सेक्टर येथे ध्वजारोहण Watch Video)
अमोल यादव यांनी याबद्दल असे म्हटले आहे की, आम्ही हे एअरक्राफ्ट 2016 मध्ये 'मेक इन इंडिया' अंतर्गत प्रदर्शित केले होते. अखेर आम्हाला 2019 मध्ये उड्डाणासाठी परवानगी दिली गेली. तसेच आणखी दोन परिक्षण सुद्धा करण्यात आली आहे. त्याचसोबत 6 सीटरचे हे विमान भारतातील विमान निर्माण उद्योगाला स्वदेशी बनवण्याकडील एक महत्वाचे पाऊल आहे.(Independence Day 2020: 'आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी भारतीयांचा मंत्र बनला आहे'; स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाल किल्ल्यावरुन देशावासियांशी संवाद)
We exhibited this aircraft in 2016 under Make In India scheme. Finally, we got the permit to fly in 2019. There are two other tests lined up. This is a very important step to indigenise the aircraft manufacturing industry in India: Captain Amol Yadav #Mumbai https://t.co/qZgHJE9jmh
— ANI (@ANI) August 15, 2020
जेट एअरवेज मध्ये डिप्युटी चीफ पायलट म्हणून कर्तव्य बजावलेल्या अमोल यांनी घराच्या छतावर 19 वर्ष मेहनत करुन एअरक्राफ्ट टीएसी-300 बनवले होते. एअरक्राफ्ट 2011 मध्ये याच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले होते. परंतु त्यांना याच्या उड्डाणाची परवानगी देण्यात आली नव्हती. असे सांगितले जात आहे की, 1985 मध्ये मुंबईतील शिवकर तळपडे यांनी चौपाटीवर त्यांच्या विमानाचे उड्डाण केले होते. त्यानंतर 122 वर्षानंतर आता मुंबईतीलच कॅप्टन अमोल यादव यांनी स्वत:हून तयार केलेले एअरक्राफ्टचे उडवू शकणार आहेत. कॅप्टन अमोल यादव यांच्या या प्रोजेक्टचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कौतुक केले होते. 21 ऑक्टोंबर 2019 मध्ये कॅप्टन अमोल यांची मोदी यांच्यासोबत भेट घडली होती. या भेटीनंतर अमोल यांनी असे म्हटले होते की, खुद्द देशाचे पीएम या प्रोजेक्टला फॉलो करत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला होता.