Mumbai: 'मध्य रेल्वे'च्या कल्याण-दिवा रेल्वे स्थानका दरम्यान 10 एप्रिलच्या रात्री 5 तासांचा नाईट ब्लॉक
Local Train | Representational Image | (Photo Credits: File Photo)

10 April Central Line Night Block: मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा (Kalyan - Diva)  स्थानकादरम्यान सीएसटीएमकडे (CSMT) जाणारा जूना पूल पाडण्यासाठी खास पाच तासांचा रात्रकालीन मेगाब्लॉक आज (10 एप्रिल) घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री 10.30 ते 3.30 या वेळेत असेल. मध्य रेल्वेने या नाईट ब्लॉकसाठी मध्य रेल्वेच्या (Central Railway) काही लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत.

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकातील बदल आणि रद्द केलेल्या लोकल सेवा

रद्द केलेल्या लोकल

रात्री 9.54 ची कल्याण - सीएसएमटी ट्रेन

रात्री 10.54 ची कल्याण - सीएसएमटी ट्रेन

रात्री 11.05 ची सीएसएमटी - कल्याण ट्रेन

पहाटे 4.41 ची सीएसएमटी - कल्याण ट्रेन

वेळापत्रकातील बदल

  • रात्री 10.32 ची कल्याण - सीएसएमटी लोकल जलद मार्गाऐवजी 10.54 वाजता कल्याण - दिवा दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येईल.
  • सीएसएमटीकडे जाणार्‍या मेल, एक्सप्रेस गाड्यादेखील धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील.

दिवा स्थानकातील पूल पाडणार

कल्याण ते दिवा स्थानका मेगा ब्लॉक घेऊन दिवा स्थानकातील पूल पाडला जाईल.

14 मार्च दिवशी सीएसएमटी परिसरात टाईम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगकडे जाणार्‍या पूलाचा काही भाग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेनंतरआता प्रशासनाकडून धोकादायक पूलांची नव्याने पाहणी करून दुरूस्तीची कामं हाती घेण्यात आली आहेत.