मुंबई मध्ये दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायामध्ये ढकलण्याच्या आरोपाखाली एका 28 वर्षीय व्यक्तीला अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई (Mumbai) मध्ये बोरिवली (Borivali) भागात एका व्यक्तीला दोन अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायामध्ये (Prostitution) ढकलल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार ही अटक मंगळवारी झाली आहे. नितीन नविन सिंग असं त्याचं नाव असून तो 28 वर्षीय तरूण आहे. मीरा रोडचा रहिवासी असणार्‍या नितीनला क्राईम ब्रांच च्या Unit XII कडून अटक करण्यात आली आहे. ही अटक एका टीप वरून झाली. मालदार ग्राहकाकडे प्रत्येकी 5 लाख असा मुलींचा सौदा होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.

दरम्यान पोलिसांनी दोन्ही मुलींची सुटका केली आहे. तर नितीन सिंग याच्यावरProtection of Children from Sexual Offences (POCSO) Act आणि Immoral Traffic (Prevention) Act provisions अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (नक्की वाचा: Mumbai Shocker: अंधेरी मध्ये 51 वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक) .

मुंबई मध्ये मागील काही दिवसांत महिला सुरक्षा बाबत अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या धामधूमीत शहराला हादरवणारी साकीनाला बलात्कार आणि हत्या प्रकरण सध्या चर्चेमध्ये आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह विभाग आणि पोलिसांसोबत विशेष बैठक घेत महिला सुरक्षेबाबत चर्चा केली आहे.