मुंबईतील जे.जे. रुग्णालयात 18 टक्के व्हेंटिलेटर्स निकामी, राज्य मानवी हक्क आयोगाकडे माहिती सादर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध रुग्णालय जे.जे.  (J.J. Hospital) येथे देशभारातून लाखोजण उपचार घेण्यासाठी येतात. परंतु या जे.जे. रुग्णालयात 18 टक्के व्हेंटिलेटर्स निकामी असल्याची माहिची खुद्द रुग्णालयाने राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे.

जे.जे. रुग्णालयात एकूण 1350 रुग्णांची सोय होईल एवढे खाटा आहेत. तसेच 83 व्हेंटिलेटर्स असून त्यामधील 15 व्हेंटिलेटर्स निकामी आणि दुरुस्तीसाठी देण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहेत. तर दुरुस्तीसाठी डझनभर व्हेंटिलेटर्समधील काही सुटे भाग हरविले असल्याची माहिती सुद्धा रुग्णालयाने दिली आहे.(हेही वाचा-पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, उस्मानाबाद जिल्ह्यातील तलमोड गावातील घटना)

तर आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी असे म्हटले आहे की, आधीच शहरात व्हेंटिलेटर्सचा तुडवडा असून खासकरुन मुंबईतील काही रुग्णालयात व्हेंटिलेटर्स निकामी आहेत. तसेच मुंबईतील महापालिका रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्सची स्थिती आणि सुव्यवस्थापाना विषयीसुद्धा कोठारी यांनी माहिती घेतली आहे.