देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे वारंवार सांगण्यात येत आहे. तर लॉकडाउनमुळे विविध जिल्ह्यात अडकलेल्यांना आपल्या घरी पाठवण्यात येत आहे. त्यासाठी विशेष ट्रेन सुरु करण्यात आल्या असून त्यांना आपल्या घरी जाता येत आहे. याच दरम्यान आता मुंबईतील धारावी येथून सांगलीत आलेल्या एका 12 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. धारावीत दररोज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने तो परिसर कंन्टेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
सांगली येथे सध्या 31 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत सांगलीतील कोरोनाबाधितांचा आकडा 73 वर पोहचला आहे. राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन नुसार राज्याची विभागणी करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे हे कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने त्यांना रेड झोन घोषित केले आहे. परंतु ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये लॉकडाउनचे काही नियम शिथील करण्यात आले असले तरीही तेथे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.(Maharashtra Police: कोरोनावर मात करुन ड्युटीवर रुजू झालेल्या महाराष्ट्र पोलिसांचा प्रेरणादायी व्हिडिओ नक्की पाहा, जनतेला देतायत मोलाचा संदेश)
#सांगली जिल्ह्यात #धारावीतून आलेल्या बारा वर्षाच्या मुलीला #कोरोना झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ . अभिजित चौधरी यांनी दिली. सांगली जिल्ह्यात 31 कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यात एकूण 73 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.@Info_Sangli @Shivaji1655
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 23, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 44582 वर पोहचला आहे. तसेच 1517 जणांचा बळी गेला असून 30482 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असल्यास नागरिकांनी घरात थांबून नियमाचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे. तर राज्य सरकारकडून स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.