मुंबईतील (Mumbai) गजबजलेल्या मुलुंड (Mulund) परिसरात सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना समोर आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी चोरी झाली ते ठिकाण मुलुंड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच असल्याने खळबळ उडाली होती. या दरोड्याचा एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला होता. आता या प्रकरणी मुंबईच्या मुलुंड पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली असून, दरोड्यात वापरलेली शस्त्रेही जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड परिसरात भरदिवसा 70 लाख रुपयांच्या दरोड्याच्या घटनेची उकल पोलिसांनी केली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 48 तासांत 8 आरोपींना अटक केली असून लुटलेल्या रकमेतील 37 लाख रुपये जप्त केले आहेत. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 4 पिस्तुले, 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 27 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
Maharashtra | 8 accused arrested within 48hrs of a Rs 70 lakh robbery in broad daylight at V P Enterprises office in Mumbai's Mulund; a recovery of Rs 37 lakhs out of the looted money, 4 pistols, 2 country-made pistols, & 27 live cartridges was made: DCP Prashant Kadam pic.twitter.com/JCmyAUYHM5
— ANI (@ANI) February 7, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील पंच रास्ता परिसरात अंगडिया फर्ममध्ये ही घटना घडली. अंगडिया फर्म शुल्क आकारून जास्तीत जास्त 24 तासांच्या आत पैसे, हिरे आणि दागिने हस्तांतरित करणे यासारख्या सेवा प्रदान करते. या ठिकाणी चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत 77 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. (हेही वाचा: Crime: ठाणेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन सख्खे भाऊ अटकेत)
Joint team of @MumbaiPolice #MulundPolice and #Crimebranch cracked #Mulund day light robbery. 8 arrested and recovery of Rs 37 lakhs made, 4 pistols, 2 country-made pistols, and 27 live cartridges also recovered pic.twitter.com/56LsYbXBAh
— Nishat M Shamsi (@nishatshamsi) February 7, 2022
यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि सायबर सेलच्या मदतीने चोरट्यांचा सुगावा लागला. त्यांचा शोध सुरू केला असता, उज्जैनमध्ये दोन चोरांचे लोकेशन सापडले. त्यानंतर सक्रियता दाखवत स्पेशल टास्क फोर्सने दोन्ही हल्लेखोरांना महाकालेश्वर मंदिरामागील हरसिद्धी मार्गाजवळून अटक केली. येथे दर्शन घेतल्यानंतर ते राजस्थानच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मुलुंड पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलम आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.