Traffic | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये मुलुंड-ऐरोली ब्रीज (Mulund-Airoli Bridge)  वर 11 फेब्रुवारी पर्यंत वाहतूक निर्बंधित राहणार आहे. सध्या प्रशासनाकडून गर्डर लॉन्चिंग च्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. हे काम सध्या ऐरोलीच्या दिशेने होत असल्याने वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नवी मुंबई ट्राफिक पोलिसांकडून यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. नागरिकांना या ब्लॉक दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Arshiya Steel Pvt., India Ltd कडून हे गर्डर लॉचिंगचे काम होणार आहे. या कामादरम्यान नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहतूकीचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

बेलापूर कडून ठाण्याकडे जाणर्‍यांना पर्यायी मार्ग घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. फायर ब्रिगेड रोड आणि श्री राम विद्यालयाजवळील पूल टाळून सेक्टर 1, 2 आणि 3 मधून अंतर्गत रस्ते वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रबाळे स्थानकाजवळील वाहतूक पुलाखालून मुख्य रस्त्याने वळवली जाईल.

वाहनचालकांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे आणि वाहतूक वळविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे. प्रकल्प सुरक्षित आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध लागू राहतील. "निर्बंध 4 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत. पुलावर रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत वाहनांना बंदी असणार आहे" असे रबाळे वाहतूक युनिटच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.