Muharram 2019 Traffic Advisory: मोहरम निमित्त 9 ते 10 सप्टेंबर वळविण्यात आले मुंबईतील रस्ते वाहतुकीचे मार्ग, पाहा सविस्तर
Muharram (Photo Credits: Wiki Commons)

इस्लाम धर्मियांच्या मातम म्हणजेच दु:खाचा दिवस म्हणून 'मोहरम' (Muharram) हा दिवस ओळखला जातो. या महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही शहीद झाले होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. त्यांच्या या पवित्र दिवसात कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून मुंबईतील मोक्याच्या रस्त्यांवरची वाहतूक 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरला वळविण्यात आली आहे. मोहरम हा आनंदाचा सण नसून दु:खाचा दिवस आहे. या दिवशी हसेन आणि हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया समुदायातील लोक १० दिवस काळे कपडे घालतात. या बलिदानासाठी जुलूस काढला जातो.

9 सप्टेंबरला संध्याकाळी 4:00 वाजल्यापासून या वाहतूक वळविण्यात येईल. नेसबिट जंक्शन-सोफिया जुबेर जंक्शन-सर.जे.जे.जंक्शन-आय.आर.रोड- पकमोडिया स्ट्रीट-जैनबिया हॉल असे असेल.

येथे पाहा संपूर्ण यादी:

यौम-ए-आशुरा म्हणजेच मोहरम 10 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी शिया समाजातील लोक काळ्या रंगाचे कपडे घालून इमाम हुसैन आणि त्यांचाया परिवाराच्या वीरगतीची आठवण ठेवत दुख व्यक्त करतात. त्याचसोबत रस्त्यांवर यात्रा काढली जाते. मुहर्रम या महिन्याला दुखाचा महिला मानला जातो. त्यामुळे या महिन्यात शिया मुसलमान सर्व प्रकारच्या सणांपासून दूर राहतात.

मोहरम हा दिवस इस्लाम धर्मियांसाठी काळा दिवस असून शहीद हसेन आणि हुसैन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यामुळे त्यांच्या शोक दिवसानिमित्त सर्व मुंबईकरांनी सहकार्य करावे अशी आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.