MSRTC Recruitment: एसटी महामंडळ भरतीबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, घ्या जाणून
MSRTC | (Photo Credits: msrtc)

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) अर्थातच एमएसआरटीसी (MSRTC) बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता एसटी महामंडळ (एमएसआरटीसी) द्वारा घेतली गेलेली कंत्राटी भरती रद्द करण्यात आली आहे. याचा कंत्राटी भरतीद्वारे सेवेत आलेल्या 5 हजार चालकांना (Contract Basis Driver) फटका बसणार आहे. एसटी महामंडळाकडून 5 हजार कंत्राटी चालक भरले जाणार होते. तसा प्रस्ताव होता. त्यातील काही चालकांची भरतीही करण्यात आली होती. पाठिमागच्या काही काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. या संप काळात कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली. ही भरती करुनही एसटीला चालकांची कमतरता भासत होती. त्यामुळे सुमारे 5 कंत्राटी चालकांची भरती करण्याचा महामंडळाचा विचार होता. त्याबाबत निर्णय झाला होता.

एसटी महामंडळाकडे मनुष्यबळाचा मोठा अभाव जाणवतो. उपलब्ध गाड्यांच्या तुलनेत चालक, वाहकांची संख्या फारच कमी आहे. त्याचा महसूल आणि उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे महामंडळाला वरंवार कंत्राटी कामगारांची मदत घ्यावी लागते. त्यासाठी अधून मधून कंत्राटी कामगारांची भरती करावी लागते. त्यातच एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी मोठा संप केला. या संपामुळे काही कामगारांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मनुष्यबळावर आणखी फटका बसला.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना काही कंत्राटी कामगारांची भरती करण्या आली होती. त्यापैकी काही कामगारांना कमी करण्या आले होते. तर काही कामागारांना मुदतवाढ दिली होती. हे सर्व कंत्राटी कामगार होते. त्यामुळे आता राज्य सरकार नव्याने काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता आहे.