एसटी महामंडळाच्या बसची (MSRTC Bus) अवस्था आणि त्याचा प्रवास यामधील ढिसाळपणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काल एका वायरल व्हीडिओ मध्ये चक्क बसचं छप्पर अर्धवट अवस्थेमध्ये उडत असल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यावरून पुन्हा एसटीच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे. या वायरल क्लिप नंतर तातडीने त्याची चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित अधिकार्याला बडतर्फ देखील करण्यात आलं आहे. हा प्रकार गडचिरोलीमधील आहे. गाड्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एका अधिकार्याला कामावरून हटवण्यात आले आहे.
MSRTC vice chairman आणि MD Shekhar Channe यांनी PTI ला माहिती दिली तेव्हा बस गडचिरोलीच्या अहेरी डेपो मधील असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून त्यांना तातडीने कामावरून काढून टाकण्यात आल्याचं सांगितले आहे.
Mumbai: MSRTC bus runs with partially broken rooftop. A probe has been ordered in the case. #Mumbai #MSRTC pic.twitter.com/6Ukk04uHrR
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) July 27, 2023
गडचिरोली-अहेरी मार्गावर ही बस धावत होती. त्यावेळी बसचे संपूर्ण छत फडफडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हे संपूर्ण छत उडाले नाही पण बस महामार्गावर धावत असताना चालकाच्या केबिनच्या वरचा केवळ बाह्य फायबरचा भाग तुटला आणि हवेत फडफडत असल्याचं सांगण्यात आले आहे. Archana Atram: एसटीचे स्टेअरींग आता महिलांच्या हाती, अर्चना आत्राम ठरल्या पहिल्या महिला बस चालक .
प्रवाशांच्या केबिनवरील बाह्य अॅल्युमिनियमच्या छताचा भाग आणि संपूर्ण बसच्या छताचा आतील थर नीट होता, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे बसच्या चालक वाहक आणि प्रवाशांना तुटलेल्या छप्पराची माहितीच नव्हती. बाजूने जाणार्या इतर वाहनांच्या चालकांनी त्याची माहिती दिली. RTO कडून त्यावर कारवाई करण्यात आली आहे का? याची माहिती मिळू शकलेली नाही.
MSRTC ही देशातील मोठी पब्लिक ट्रान्सपोर्ट बॉडी आहे. सुमारे 15 हजार बस त्यांच्या ताफ्यात आहेत. रोज सुमारे 60 लाख प्रवासी एसटी बस मधून प्रवास करतात. मात्र खराब देखभालीमुळे एसटी बसची अवस्था खराब झालेली आहे. कोरोना संकटानंतर अनेकांनी बस मध्ये गळती होत असल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत.