Thane Accident: ठाणे येथे एमएसआरटीसी बस (MSRTC Bus) ने मेट्रो रेल्वेच्या खांबाला धडक दिल्याने आठ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजता ओवळा गावाजवळ पानखंडा रोडवर घडली आणि जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, असे कासारवडवली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. चालक कृष्णा अडसूळ हा बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवत होता. एमएसआरटीसीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
ठाण्यात पानखंडा रोडवर MSRTC Bus ची मेट्रो ट्रेनच्या खांबाला धडक -
Thane Accident: 8 Injured After MSRTC Bus Hits Metro Train Pillar on Pankhanda Road Near Ovlahttps://t.co/qTB2wKYSkZ#Thane #Accident #RoadAccident #MSRTCBus
— Lokmat Times (@lokmattimeseng) January 12, 2025