शालेय जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीच्या बोर्डाची परीक्षा (10th Board Exam). येत्या वर्षातील म्हणजेच 2020 मधील दहावीची परीक्षा 3 मार्च पासून सुरु होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार, 3 मार्च ते 23 मार्च या दरम्यान दहावी बोर्डाची परीक्षा घेतली जाणार आहे. संबंधित परीक्षेचे वेळापत्रक आपण www.mahahsscboard.in या महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. पण तत्पूर्वी इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका, परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे नवीन बदल लक्षात घेऊन त्यानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी मंडळाने सुचवले आहे.
(हेदेखील वाचा- Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा)
प्राप्त माहितीनुसार, इयत्ता 10 वीच्या विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना तयार करण्यात आल्या आहेत. सध्या सुरु असणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2019-20पासून दहावीच्या भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षा 80 गुणांची असणार आहे तर व अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे राहणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली होती. संबंधित निर्णय हा इयत्ता 9 वी साठी सुद्धा लागू होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेतली जाते, त्यामुळे साहजिकच हे सर्व बदल राज्यात सर्वत्र लागू होणार आहेत.