MPSC Group C Admit Card 2022 जारी; mpsconline.gov.in वरून डाऊनलोड करा हॉल तिकीट
MPSC logo (Photo Credits: Website)

एमपीएसई कडून ग्रुप सी प्रिलिम्स परीक्षांचे अ‍ॅडमीट कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. उमेदवारांना एमपीएसई ची अधिकृत वेबसाईट mpsconline.gov.in यावर हॉल तिकीट पाहता येणार आहे. 900 जागांवर MPSC Group C Recruitment 2022 होणार आहेत. त्यासाठीचं अ‍ॅडमीट कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करता येणार आहे. यंदा 3 एप्रिल दिवशी ही परीक्षा होणार आहे.

इंडस्ट्री इन्सपेक्टर, डेप्युटी इन्सपेक्टर, टेक्निकल असिसंट, टॅक्स असिस्टंट, क्लार्क टायपिस्ट - मराठी आणि इंग्रजी या पदांसाठी नोकरभरती होणार आहे.

ऑनलाईन अ‍ॅडमिट कार्ड कसं कराल डाऊनलोड?

mpsconline.gov.in ला भेट द्या

होमपेजवर ‘ Download Admission Certificate’ सिलेक्ट करा.

नव्या पेजवर 269/2021-Maharashtra Group C Services Pre Examination 2021 निवडा.

त्यानंतर मोबाईल किंवा इमेल एंटर करून त्यावर येणार्‍या ओटीपीने तुमचं अ‍ॅडमीट कार्ड पाहू शकता.

डिसेंबर 2021 मध्ये या परीक्षेसाठी एमपीएससी कडून नोटिस जारी केली होती. आता या परीक्षेची मेन परीक्षा ऑगस्ट 2022 मध्ये होणार आहे.