MPSC Exam Postponed: महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकी जवळ आल्याने MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भात MPSCने प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहिर करू असंही पत्रकात सांगण्यात आलं आहे. (हेही वाचा- लोकसभा निवडणुकीआधी सत्ताधारी नेत्यांच्या 13 साखर कारखान्यांना 1,898 कोटींचं कर्ज
एप्रिलचा 28 तारखेला ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024’, तसेच 19 मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या दोन परीक्षांचा तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. MPSC या संदर्भात प्रसिध्दी पत्रक जाहिर केले आहे. सुधारित तारखा लवकरच कळवण्यात येतील अशी माहिती समोर आली आहे.
MPSC Exam Postponed:
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहिर केल्यानंतर आचारसंहिता लागून झाली आहे. दरम्यान MPSC तर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परिक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत आहेत अशी चर्चा सुरु आहेत. याबाबत अधिकृत घोषणा नसल्यामुळे MPSC च्या उमेदवारांना संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा विद्यार्थ्यांच्या परिक्षा लांबणीवर जाणार असल्यामुळे चिंता वाढल्याचे चित्र दिसत आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम 2024 मधील आरक्षमाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परिक्षांबाबत घोषणा केली जाणार स्पष्ट करण्यात आले आहे.