Shrikant Shinde | (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाल्यापासून ते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. कधी भर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माईक खेचल्याने तर कधी प्रसारमाध्यमांच्या समोर मंत्री गिरीश महाजन यांनी तोंडाला (स्वत:च्या) पेपर लावून पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर सांगितल्याने. या ना त्या कारणाने एकाथ शिंदे (Shrikant Shinde) चर्चेत आहेत. आता तर एखाद्या वारसाने गादी चालवावी तशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे त्यांची खुर्ची सांभाळत असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत श्रीकांत शिंदे हे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसलेले दिसतात.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मात्र या फोटोबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहेत. प्रसारमाध्यमांतून वृत्त आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांतून आलेले वृत्त फेटाळून लावले. जो फोटो पाहायला मिळतो आहे त्यात मी ज्या खुर्चीवर बसलो आहे त्या खुर्चीमागे महाराष्ट्र सरकारचा एक बोर्ड आहे. परंतू, हा बोर्ट तत्पूरत्या स्वरुपतील आणि फिरता बोर्ड आहे. हे आमचे ठाणे येथील खासगी निवास्थान आहे. या निवास्थानात जे कार्यालय आहे त्यात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे दोघेही वापरतो. त्यामुळे मागे मुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी असलेला बोर्ड मला लक्षात आला नाही. विरोधकांकडून मला केवळ बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग केले जात असल्याचे श्रीकांत शिंदे यांना म्हटले आहे. (हेही वाचा, Ravi Mhatre Replaces Milind Narvekar: उद्धव ठाकरे यांचा निर्णायक बदल? मिलिंद नार्वेकर यांच्या ऐवजी रवी म्हात्रे यांची निवड? शिवसेनेतेत खांदेपालट?)

ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी संदीप वरपे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर करत म्हटले आहे की, खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर? असा सवाल उपस्थित केला आहे. यासोबतच प्रसारमाध्यमांशी बोलताना वरपे यांनी म्हटले आहे की, संबंधीत फोटो हा अत्यंत जबाबदार व्यक्तीने मला पाठवला आहे. त्यामळे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना जर विविध सण उत्सव, कार्यक्रम यातून राज्यकारभार करण्यासाठी वेळ मिळत नसेल. त्यामुळे त्यांच्या खुर्चीवर त्यांचे सुपुत्र बसले आहेत. त्यामुळे त्यांना सुपर सीएम झाल्याच्या शुभेच्छाही आम्ही दिल्या आहेत, असे वरपे यांनी म्हटले आहे.