महाराष्ट्रामध्ये आज शिवजयंती (Shiv Jayanti) सोहळ्याचा उत्साह आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची यंदा 391 वी जयंती आहे. दरम्यान हेच औचित्य साधत पुरातत्व विभागाकडून रायगड किल्ल्यावर रोषणाई करण्यात आली आहे. मात्र खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी त्यावर नाराजी व्यक्त करत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान ही रोषणाई किल्ल्याला साजिशी नसल्याचं त्यांचं मत आहे. Shiv Jayanti 2021 Songs: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 'या' गौरव गीतांनी साजरी करा यंदाची शिवजयंती!
काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे?
संभाजीराजेंनी ट्वीट करत 'भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो.' म्हणाले आहेत.
त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे.
एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो.
(2/2)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 18, 2021
दरम्यान आज शिवनेरी वर होणार्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संभाजीराजे देखील शासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशी बोलून संभाजीराजे आपली सविस्तर भूमिका देखील आज या रायगडावरील रोषणाई बाबत मांडणार आहेत.