Mumbai Police (Photo Credits: Twitter)

आज जगभरात जागतिक मातृदिन साजरा केला जात आहे. यंदा या खास दिनावर लॉकडाऊनचे सावट असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरात बसून हा आपल्या आईसह हा दिवस साजरा करत आहेत. मात्र या लोकांमध्ये असाही एक गट आहे जो आज आपल्या आईसह हा दिवस साजरा न करता भारतमातेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. हा गट म्हणजे मुंबई पोलिस. भूक, तहान विसरून कोविड सारख्या महाभयाण संकटापासून देशाला वाचविण्यासाठी हे पोलिस रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करत आहेत. त्यामुळे या सर्वांना आपल्या मातांना एका व्हिडिओच्या माध्यमातून अनोखा सन्मान दिला आहे.

आम्ही मजबूत आहोत कारण आमची आई मनाने मजबूत आहे असे कॅप्शन मुंबई पोलिसांनी या व्हिडिओला दिले आहे. Happy Mother's Day 2020 Wishes: मातृदिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages, Images, Whatsapp Status, GIFs च्या माध्यमातून देऊन आपल्या लाडक्या आईसोबत साजरा करा हा खास दिवस!

पाहा व्हिडिओ:

 

या व्हिडिओमध्ये आपल्या आईने आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगत आहेत, जवळ राहूनही तिला भेटता येत नाही अशा अनेक गोष्टी मुंबई पोलिसांनी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत.

कोव्हिड 19 च्या जीवघेण्या विळख्यात मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबतच मुंबई पोलिस देखील अहोरात्र मेहनत आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलिसांमध्येही कोरोनाची बाधा होण्यास सुरूवात झाली. मुंबई पोलिस कमिशनर परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्य माहितीनुसार आत्तापर्यंत सुमरे 250 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी कोरोनाची लक्षणं दिसणारे अत्यंत कमी आहेत. तर कोणताही कोरोनाबाधित पोलिस कर्मचारी आयसीयूमध्ये दाखल नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.