मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 5 जूनला बीडमध्ये सरकारविरोधात मोर्चा- विनायक मेटे
Vinayak Mete (Photo Credits: FB)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर केंद्राने सुप्रीम कोर्टाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या लढ्याला योग्य तो न्याय मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेतय परंतू योग्य तो निकाल समोर येत नसल्याने शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे (Vinayak Mete यांनी येत्या 5 जूनला बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. विनायक मेटे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.

लिंगायत, मुस्लीम, धनगर या समाजालाही बरोबर घेऊन सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध हा मोर्चा असेल. मराठा समाजाला न्याय देता येत नसेल तर ठाकरे आणि चव्हाण यांनी सत्ता सोडावी, अशी टीकाही त्यांनी केली.हेदेखील वाचा- Maratha Reservation: चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज- अशोक चव्हाण

आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार बैठक घेऊन 5 जून रोजीच्या मोर्चाची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर टीका केली. महाविकास आघाडीच्या सरकारने सुरुवातीपासूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रयत्नात संशयास्पद भूमिका घेतली. राज्य सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात पाच पैकी दोन न्यायमूर्तींनी आरक्षणाचा कायदा अधिकार राज्य सरकारला असल्याचे मत मांडले.

दरम्यान केंद्राने 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्याला काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.