Nashik: नाशिक येथे एका महिलेची छेडछाड, तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण; गुन्हा दाखल
Crime Scene | Representational Image | (Photo Credits: PTI)

राज्यात एकीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. तर, दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच महिला छेडछाडीचा (Molestation) तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण केल्याची ताजी घटना उघडकीस आली आहे. तसेच आरोपीने पोलिसांना गलिच्छ शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकीही दिल्याचे समजत आहे. ही घटना नाशिकच्या (Nashik) संत कबीरनगर (Sant Kabir Nagar) झोपडपट्टीत घडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस हवालदार सागर जगन्नाथ जाधव यांनी महिला छेडछाड प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अजय घुले या संशयिताला अटक केली आहे. तसेच त्याच्या सांगण्यावरून संशयित महेश कटारिया याच्यावरही सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस संत कबीर झोपडपट्टीत गेले आणि महेशकडे विचारपूस करू लागले. मात्र, महेशने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी जोराजोरात ओरडून त्याची आई, बहीण आणि मित्रांना चक्क रॉकेलची कॅन घेऊन बोलावून घेतले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या हातातून रॉकेलचा कॅन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महेशने स्वत:च्या अंगावर ओतून घेतले. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला त्याने पोलिसांना शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Dombivli Gang Rape Case: डोंबिवली सामुहिक बलात्कार प्रकरणामधील पीडितेची स्थिती स्थिर; आरोपींशी सोशल मीडीयाद्वारा ओळख झाल्याची दिली माहिती; SIT Head Sonali Dhole

मुंबईतील गोरेगाव परिसरात तृतीयपंथीयाने वाहतूक पोलिसांसोबत केलेल्या या गैरवर्तनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तृतीयपंथीयाने खुलेआमपणे पोलिसांची कॉलरही पकडल्याचे दिसत आहे. तसेच तृतीयपंथीय आपले कपडे काढून पोलिसांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.