Maharashtra Politics: पूसद विधासभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या सद्या चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कार्यक्रमा दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भेट घेतली आणि या भेटीचे काही फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकारण वर्तुळात मोहिनी नाईक यांच्या चर्चा रंगल्या आहेत. यवतामळ वाशिम जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढण्यास इच्छुक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.
View this post on Instagram
गेल्या काही महिन्यांपासून मोहिनी नाईक या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असल्याचे दिसत आहे. यवतमाळ वाशिम जिल्ह्यात लोकसभा मतदारसंगात संपर्क वाढविण्यात भर देताना दिसत आहे. त्यामुळे मोहिनी या भाजापमधून जाऊन लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा चालू आहे. त्यामुळे यवताळ वाशिम मतदारसंघातून कोण उमेदवार लढणार अशा प्रश्न उपस्थित राहिला आहे. (हेही वाचा- दरमाह 300 युनिट मोफत वीज, जाणून घ्या काय आहे पीएम सूर्य घर योजना)
दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांच्याकडे आहे. दरम्यान मोहिनी नाईक निवडणुक उतरल्यास महायूतीत वाद पेटण्याची शक्यता आहे. यवतमाळच्या कार्यक्रमात स्वागत जाहिरातीच्या वेळीस वाशिम येथील पालकमंत्री आणि शिवसैनिक संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांचे फोटो नसल्यामुळे राजकारण तापले आहे. त्यामुळे मोहिनी निवडणूका लढणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.