Modi Cabinet 2019: मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी, अरविंद सावंत यांच्यासह महाराष्ट्राच्या 7 खासदारांना कोणतं पद मिळालं?
Modi Cabinet 2019 (File Photo)

भाजप प्रणित एनडी सरकारने यंदा लोकसभा निवडणूक 2019 मध्ये देशात भरघोस विजय मिळवला आहे. काल (30 मे) दिल्लीच्या राष्ट्रपती भवनाच्या परिसरात पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या 7 खासदारांचा समावेश होता. यंदा मोदी सरकारमध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि भाजपच्या संजय धोत्रे(Sanjay Dhotre) या दोन नव्या चेहर्‍यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे खातेवाटप करताना कुणाला कोणते खातं मिळणार याबाबत उत्सुकता होती. Modi Cabinet 2019 खाते वाटप जाहीर; अमित शहा गृहमंत्री तर निर्मला सीतारामण अर्थमंत्री

महाराष्ट्राच्या 7 खासदारांना कोणतं पद मिळालं?

कॅबिनेट मंत्री

नितीन गडकरी-परिवहन मंत्री

प्रकाश जावडेकर- पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पीयूष गोयल- रेल्वे मंत्री, वाणिज्य आणि उद्योग

अरविंद सावंत - अवजड उद्योग मंत्रालय

राज्यमंत्री

रावसाहेब दानवे- ग्राहक संरक्षण

रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री

संजय धोत्रे- मनुष्यबळ

आज संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे.