मुंबईकरांसाठी खुशखबर! तुळशी, तानसा नंतर आता मोडकसागर धरणही ओव्हरफ्लो
Dam | Image used for representational purpose | (Photo Credits: ANI Twitter)

मागील दोन दिवसांपासून मुंबईसह उपगनरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काल (25 जुलै) तानसा तलाव ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर आता मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर धरणही ओसंडून वाहू लागलं आहे. आज (26 जुलै) सायंकाळी 5 वाजल्यानंतर हे धरण भरुन वाहण्यास सुरुवात झाली. यापूर्वी मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी आणि तानसा तलाव ओव्हरफ्लो झाले होते.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या तलावांमध्ये केवळ 5% पाणीसाठा शिल्लक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले होते. त्यामुळे मुंबईत 10% पाणीकपात देखील करण्यात आली होती. त्यातच पावसाळा सुरु झाल्यानंतर जून महिना कोरडा गेल्याने पाणीटंचाईचे संकट मुंबईकरांच्या डोक्यावर होते. मात्र यापूर्वी झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली होती. त्यामुळे 10% पाणीकपातही रद्द करण्यात आली होती. (मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव ओव्हरफ्लो; मुंबईकरांचे पाणीसंकट टळण्याची चिन्हं)

पहा व्हिडिओ:

असाच समाधानकारक पाऊस झाल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारी इतर तलावही भरतील आणि मुंबईकरांची पाणीकपातीची समस्या सुटेल.