Raj Thackeray Troll: 'भाडोत्री पक्षाचा भाडोत्री...'; भाजपला पाठिंबा देताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेटकऱ्यांकडून ट्रोल
Photo Credit- x

Raj Thackeray Troll: महाराष्ट्रात लोकसभा निवडणूका अवघ्या महिना भराच्या कालावधीवर आल्या आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय नेत्यांचं पक्षांतर जोरदार सुरू आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनी महायुतीला मनसे(MNS)चा पाठींबा जाहीर केला आहे. मनसे पाडवा मेळावा (MNS Gudi Padwa Melava) राज ठाकरेंनी महायुतीला जाहीर पाठींबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मनसे भाजपसोबत जाणार असल्याच्या गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चेंना फूलस्टॉप मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे, असे सांगणारे मी पहिले व्यक्ती असल्याचा दावा राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी केला. मात्र, यानंतर राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झालेत. (हेही वाचा :'तंबाखू आरोग्यास हानिकारक', 'नवनिर्माण ते नमोनिर्माण'; Raj Thackeray यांच्या निर्णयावर टीकेची झोड)

राज ठाकरे यांनी एकीकडे लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठींबा देताच दुसरीकडे मनसेमध्ये गळतीला सुरूवात झाली. ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हा निर्णय होऊन काही तास होत नाही तोच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्यास सुरूवात केली आहे.

'निवडणूक न लढवता कसा काय पक्ष मोठा होणार?कार्यकर्ते कसे active राहणार?विधानसभेच गाजर दिलंय खर शाह नी पण किती जणांना?आधीच दाटीवाटी आहे त्यात तुमचा निभाव कसा लागणार?बाळासाहेबांनी उध्दव ठाकरे यांना शिवसेना सोपविली हे योग्यच केलं,' असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

दुसऱ्या नेटकऱ्याने भाडोत्री पक्षाचा भाडोत्री नेता असे म्हणत नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

'मोदींना बिनशर्त पाठिंबा का आणि कशासाठी ? महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला घेऊन जाण्यासाठी...महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल...मराठी माणसाचे वारंवार खच्चिकरण केल्याबद्दल...हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हितासाठी बनवलेली शिवसेना फोडल्याबद्दल...उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केल्याबद्दल' असे तिसऱ्या नेटकऱ्यानं म्हटले आहे.